पंकजा मुंडेंची भाजपला सोडचिठ्ठी ?

पुणे: राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना परळी विधानसभा मतदार संघात पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि पंकजा यांचे बंधु धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना विधानसभा निवडणुकीत धुळ चरत विजय मिळवला आहे. त्यानंतर पंकजा यांनी पराभव मान्य करत पक्षाच्या मिटींगला हजेरी लावणे सुरु केले होते. परंतु पंकजा यांच्या पराभवात भाजपातीलच काही बड्या नेत्यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगात आहे. त्यावर या चर्चेला दुजोरा देणारे वक्तव्य पंकजा यांनी केले आहे.

पंकजा यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट केली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे अशा आशयाची पोस्ट पंकजा यांनी शेअर केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पंकजा यांच्या सदर फेसबुक पोस्टनंतर राज्यातील राजकारणात आणखी एक भुकंप येणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पंकजा मुंडे यांनी येत्या १२ डिसेंबरला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी आपण पुढे कोणत्या मार्गाने जायचं हे जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पंकजा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)