मराठी चित्रपटसृष्टीतील ‘या’ अभिनेत्रीला अटक

मुंबई – आतापर्यंत मी टू प्रकरणामुळं सिनेमातल्या चंदेरी दुनियेतली काळीबाजू जगासमोर आली. पण या प्रकाणाची आणखी एक बाजू आता लोकांसमोर आली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सारा श्रवणला हिला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

अभिनेता सुभाष यादव याच्यावार कास्टिंग काऊच आणि विनयभंगाचे आरोप करुन त्याच्याकडून खंडणी उकळली. या प्रकरणी साराला अटक करण्यात आली आहे. वर्ष दीड वर्षभरापूर्वी आलेला “रोल नंबर १८” या चित्रपटात सारा आणि सुभाष यादव एकत्र दिसले होते.

दरम्यान, य़ा प्रकरणी एक पोलीस अधिकाऱ्यासह तिघांना अगोदरच अटक झाली होती. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता दुबईला गेलेल्या सारालाही अटक करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

??????, ?????, ???????…?

A post shared by Sara Shrawan. (@sarashrawan) on

सुभाष यादव याने दिलेल्या फिर्यादीवरुन सहकारनगर पोलीस ठाण्यात साराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.