Entertainment : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) याने अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत (Samantha Ruth Prabhu) घटस्फोट घेतल्यानंतर या दोघांची नेहमीच चर्चा रंगलेली असते. समंथा रुथनंतर आता नागा चैतन्यचे नाव अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत (Sobhita Dhulipala) जोडले जात आहे. नुकतेच या दोघांच्या डिनर डेटचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामूळे हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर आता तो लवकरच दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणार असल्याचे म्हंटले जात आहे.
मात्र नाग चैतन्यचं दुसरं लग्न शोभिताशी होणार नसून त्याच्या या दुसऱ्या लग्नाची प्लॅनिंग वडील नागार्जुन करत आहेत. अक्किनेनी कुटूंबाची होणारी सून ही एका बिझनेसमन कुटूंबातील असणार आहे, अशीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही. एकीकडे नागा चैतन्यच्या लग्नाची चर्चा सुरू असताना एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, नाग चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाबाबतची अफवा असल्याचे सांगितले आहे. नाग चैतन्य दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चा खोट्या असून फेक न्यूज अचानक पसरवली जात असल्याचे म्हंटले आहे.
दरम्यान, समंथा आणि नागा चैतन्य ही साऊथमधील एक फेमस कपल होत. फॅन्सने तर या जोडीला अक्षरशः डोक्यावर घेतलं होत त्यामुळे यांचं रिलेशन तुटल्यापासून अनेक फॅन्स देखील नाराज झाले होते. 2017 मध्ये अभिनेता नागा चैतन्यशी लग्न केले होते. चार वर्षांनंतर, 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आता त्याचे नाव शोभिता धुलिपाला सोबत जोडले जात आहे.
नागा चैतन्याच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, शेवटचा तो आमीर खानच्या ‘लाल सिंग चढ्ढा’मध्ये दिसला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात आमिरसह करीना कपूर देखील होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. आमिरला तो मोठा धक्का होता. त्यानंतर त्याने सिनेसृष्टीपासून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.