सलमान-टायगर करणार धम्माल?

बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला यांच्यासाठी टायगर श्रॉफप्रमाणे सलमान खानदेखील तितकाच खास आहे. साजिद अनेक वर्षांपासून सलमानबरोबर चित्रपट बनवत असून दोघांनी अनेक मनोरंजक आणि हिट चित्रपट दिले आहेत. तसेच साजिदनेच टायगरचे लॉंचिंग केले होते. त्यांची ही जोडी हिरोपंतीपासून बागी सिरीजपर्यंत हिट ठरली आहे.

साजिद हे त्यांच्या नायकाशी खूप मैत्रीपूर्ण नाते जपत असतात. यामुळेच सलमान आणि टायगर यांचा साजिदवर विश्‍वास आहे. साजिद सध्या सलमानसाठी “किक 2′ आणि टायगरसह “हिरोपंती-2′ आणि “बागी 4’साठी योजना आखत आहे. या चित्रपटांची पटकथा निश्‍चित केली जात असून परिस्थिती सामान्य होताच शूटिंग सुरू करण्यात येणार आहे.

त्यातच आता अशी चर्चा रंगत आहे की, साजिद हे सलमान आणि टायगर या दोघांना एकत्रित घेऊन एक चित्रपट साकारण्याची योजना आखत आहेत. जर तसे झाले तर दोन्ही स्टारच्या चाहत्यांमध्ये रोमांच उभा राहणार आहे. या दोघांचा ऍक्‍शन चित्रपट साकारण्यात येणार आहे. सलमानलादेखील ऍक्‍शन रोलमध्ये काम करण्यास आवडते. दुसरीकडे टायगर श्रॉफ जणू फक्‍त ऍक्‍शनसाठीच बनला आहे.

दरम्यान, आजकाल एका चित्रपटाचे पात्र दुसऱ्या चित्रपटातही दाखविले जात आहे. जसे “सिंघम’मधील पात्र “सिंबा’ या चित्रपटात दिसले. त्याचप्रमाणे “किक’ आणि “बागी’तून एखादा चित्रपट साकारण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.