मंत्रिमंडळात समावेश होईल; रामदास आठवलेंना विश्वास

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यास नरेंद्र मोदी सज्ज झाले आहेत. आज संध्याकाळी मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्या समवेत केंद्रीय मंत्रिपदांची शपथ घेण्याचा मान कुणाला मिळणार याविषयीचा सस्पेन्स कायम असून कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अशामध्येच रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

रामदास आठवले म्हणाले कि, मोदीजींच्या मंत्रिमंडळात माझाही समावेश असेल. मला आज त्याविषयी फोन येण्याची आशाही आहे. मला देशाची सेवा करण्याची आणखी एक संधी मिळेल असे मला वाटते आहे. मला चांगली जबाबदारी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, रामविलास पासवान, अनुप्रिया पटेल आणि अरविंद सावंत यांच्या नावावर केंद्रीय मंत्री म्हणून जवळजवळ शिककामोर्तब झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)