भिगवण -येथील डाळज नं 3 (ता. इंदापूर) येथे पुणे-सोलापूर महामार्गावर झालेल्या रिक्षा व कार अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर एक व्यक्ती जखमी झाला आहे. पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जात असलेल्या (एमएच 24 एटी 2460) या रिक्षाला स्विफ्ट कार (एमएच 06 एएल 2571) ची पाठीमागून धडक दिली. या रिक्षामध्ये पती-पत्नी प्रवास करीत होते.
पत्नी सविता राजाभाऊ भोसले (वय 32) या मयत झाल्या असून पती राजाभाऊ बलभिम भोसले (वय 36) हे जखमी झाले आहेत. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भिगवण पोलीस करीत आहेत.