अकलूज -येथील सुमित्रा नगरमधील एका व्यक्तीचा अहवाल करानो पॉझिटिव्ह अहवाल आला असल्याने तालुक्यात आत्तापर्यंत करोना रुग्ण संख्या सहा झाली आहे, तर बाहेरच्या तालुक्यातून आलेल्या एका व्यक्तीचाही अहवाल करोना पॉझिटिव्ह आला असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांनी सांगितले.
आत्तापर्यंत आढळलेल्या रुग्णांपैकी पाच रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर दोन रुग्णांवर उपचार सुरू आहे. आज शंकरनगर (सुमित्रानगर) मध्ये आढळलेला रुग्ण हा मुंबईहून आला होता. दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.