बेल्हे – गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथील शाळेत विलीगिकरण करण्यात आलेल्या ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. सदर व्यक्ती आपल्या कुटुंबासमवेत ६ दिवसांपूर्वी मुंबईवरून गावी आली होती.
गावी आल्यानंतर त्यांच गावातील शाळेत विलीगिकरण करण्यात आल होत. त्यांच्या समवेत त्यांचा मुलगा व पत्नी यांना ही शाळेत विलीगिकरण करण्यात आलं होतं. सदर व्यक्तीचा शुक्रवार (दि.३) रात्री मृत्यू झाला.
खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने या व्यक्तीच्या संपर्कातील पत्नी व मुलगा यांना लेण्याद्री येथील कोविडं सेंटरमध्ये तपासणीसाठी शनिवार (दि.४) रोजी पाठवण्यात आले असून दोघांचेही स्वब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. अशी माहिती बेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी एस. बी. थोरात यांनी दिली.