मुंबई – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राज्यातील मुख्यमंत्री यांच्यात विविध विषयांवर बैठक पार पडली. मोदी यांनी आज देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सांवाद साधताना पेट्रोल डिझेलवरील कर राज्यांनी कमी करावे असे सुचविले. केंद्र आणि राज्यात आर्थिक ताळमेळ असावा, असे त्यांनी सुनावले.
दरम्यान महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ यांनी पेट्रोल डिझेलवरील कर कमी केला नाही. त्यामुळे येथे पेट्रोल, डिझेलचे भाव जास्त असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर टीका केलीय. महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात ( डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो.
महाराष्ट्रात आणि अन्य राज्यात पेट्रोलचे दर
दमण – १०२ रूपये, पालघर – १२० रूपये ( १८ रुपयांनी महाग )
गुजरात – १०५ रूपये, नंदुरबार – १२१ रूपये, ( 24 रुपयांनी महाग )
गोवा – १०६ रूपये, सिंधुदुर्ग – १२२ रूपये ( १६ रुपयांनी महाग )
कर्नाटक – १११ रूपये, कोल्हापुर – १२१ रुपये ( १० रुपयांनी महाग )
मध्यप्रदेश – ११९ रूपये, गोंदिया – १२१ रूपये ( ३ रुपयांनी महाग )