मुंबई – चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत असलेला रवींद्र जडेजा भविष्यात भारतीय संघाचाही कर्णधार होऊ शकतो, असा विश्वास चेन्नईचा फलंदाज अम्बाती रायडू याने व्यक्त केला आहे.
सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत जडेजा चेन्नईचे नेतृत्व करत आहे. संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने यंदाच्या मोसमाचा प्रारंभ होण्यापूर्वीच नेतृत्व सोडले व ती जबाबदारी जडेजाकडे आली. तो धोनीकडून सातत्याने कर्णधारपद कसे सांभाळायचे किंवा त्यामागे काय मेहनत घ्यायची हे सर्व काही शिकत आहे. यातूनच अनुभव घेत जडेजा देशाचेही नेतृत्व करेल, असेही रायडू म्हणाला.