का म्हणतोय हृतिक कुणाला सांगू नका बॉडी कशी बनते…

मुंबई – हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ च्या पहिल्या दिवसाचे कलेक्‍शनचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. हृतिक आणि टायगर या दोघाही ऍक्‍शन हिरोंना फर्स्ट टाईम सिल्वर स्क्रीनवर बघून “वॉर’ला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे.


दरम्यान, या चित्रपटमुळे सध्या हृतिक आणि टायगरच्या अभिनयासोबत फिटनेसचा विषय सोशल माध्यमांमध्ये चांगलाच रंगत आहे. दोघांमध्ये तुलनाही केली जात आहे. या अपेक्षांमध्ये हा सिनेमा उतरलाही पण टायगरच्या फिटनेसला मॅच करणं हृतिकसाठी सोप्पं नव्हतं. वॉरसाठी हृतिकला पुन्हा फिट होणं गरजेच होतं.

 

View this post on Instagram

 

Transformation film

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on


त्यामुळे चित्रपटासाठी हृतिकनं बॉडी शेपमध्ये आणण्यासाठी किती मेहनत घेतली याचा अनुभव सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. हृतिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Mood hai भयंकर ! #JaiJaiShivShankar Song out Tom

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on


दरम्यान, बॉक्‍स ऑफिसच्या आकडेवारीनुसार “वॉर’चे ओपनिंग खूपच जबरदस्त झाले आहे आणि पहिल्या दिवशीच या ऍक्‍शनपॅक्‍ड सिनेमाने 50 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. तर आतापर्यंत ‘वॉर’च्या 200 कोटींचे कलेक्‍शन जमा झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.