चीनमधील मृतांच्या आकड्यातील ‘गडबडी’चे WHO कडून समर्थन

वुहान : कोरोनाच्या संक्रमणामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या आकड्यात चीनने सुधारणा केली आहे. यापूर्वी चीनने दिलेल्या मृतांच्या आकडेवारीच्या जवळपास ४० टक्के वाढीव आकडा नव्याने जारी करण्यात आला आहे. कोरोना विषाणूमुळे देशातील परिस्थिती लपवत असल्याचा आरोप चीनवर झाला होता. तर चीनचा खोटेपणा उघड झाला असे चित्र निर्माण होत असताना जागतिक आरोग्य संघटनेकडून चीनला समर्थन मिळाले आहे.

कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवल्यानंतर अन्य देश देखील चीनप्रमाणे मृतांच्या आकड्यात सुधारणा करुन ती नव्याने जारी करु शकतील, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. वुहानमध्ये कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग खूपच होता. परिणामी अधिकाऱ्यांना प्रत्येक मृतकांची नोंद करणे जमले नाही.वुहानमध्ये निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत आरोग्य सेवा प्रणालीवर अचानक मोठा दबाव निर्माण झाला. काही लोकांनचा घरी मृत्यू झाला तर काही लोक अस्थायी केंद्रावर होते.

आरोग्य सेवा पुरवणाऱ्या प्रत्येकाने उपचार करण्याला प्राधान्य दिले. त्यांनी याकाळात कागदोपत्री काम बाजूला ठेवले. कोरोना विषाणूने प्रभावित सर्व देशात अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर अन्य राष्ट्रांनी मृतांच्या आकड्यात सुधारणा करुन योग्य ती आकडेवारी सादर करणे अपेक्षित आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या आपतकालीन विभागाचे संचालक मायकल रेयान यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.