मुंबई – कॉमेडी स्टार कपिल शर्मा भल्या स्टार्सना आपल्या कॉमेडीमध्ये अडकतो आणि त्यांच्याकडून अनेक गोष्टींबाबत उत्तरे उदवून घेतो. कपिल शर्माच्या या नव्या डॅक्टची शिकार झाली अभिनेत्री सारा अली खान. कपिलने चालू कार्यक्रमात साराला चक्क तिच्या बॉयफ्रेंडबाबत प्रश्न विचारला. यानंतर साराची एकच धांदल उडालेली पाहायला मिळाली.
विकी आणि साराचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी साराने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी कपिलने चित्रपटासह तिच्या खाजगी आयुष्याबाबत देखील गप्पा मारल्या.
अभिनेत्री सारा अली खान अनेकदा तिच्या अफेअरमुळे चर्चेत असते. क्रिकेटर शुभमन गिलसोबत साराचे नाव चर्चेत आल्यापासून सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा सुरु असते. एवढच काय आयपीएलमध्ये शुभमनने केलेल्या जबरदस्त खेळांनंतर नेटकऱ्यांनी साराचे अनेक मिम्स व्हायरल केले होते. याबाबतचा गोंधळ दूर करण्यासाठी कपिल शर्माने साराला थेटपणे बॉयफ्रेंडबाबत विचारले.
कपिल शर्माच्या शोमध्ये सारासोबत गप्पा रंगलेल्या असताना कपिलने प्रश्न केला,”सारा.. सांगूनच टाक. तुझा बॉयफ्रेंड कोण आहे ? तो फिल्म इंडस्ट्री मधीलच आहे का ?” यावर सारा काहीशी गडबडली. असा प्रश्न समोर येईल याची तिला अजिबात कल्पना नव्हती. या प्रश्नाचे उत्तर न देता साराने वेळ मारून नेली आणि विषयांतराचा प्रयत्न केला. यावर कपिल म्हणाला आम्ही फक्त बाण मारत आहोत,कोणास ठाऊक कधी निशाणा लागेल. यावर सारा म्हणाली,हो पण आजकाल माझा एकही बाण निशाण्यावर लागत नाही.