…म्हणून पी. चिदंबरम यांनी केले मोदींचे कौतुक

नवी दिल्ली – स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक मुद्यांना हात घातला. या मुद्यांबरोबरच त्यांनी काही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहे. जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम रद्द ते दहशतवाद आणि प्लस्टिक बंदी सारख्या मुद्यांवर त्यांनी केलेल्या भाषणाला देशवासीयांची चांगलीच पसंती मिळाली. तसेच अनेकदा विरोधी पक्ष नेत्यांकडून टीका होणाऱ्या मोदींचे यावेळी मात्र कौतुक केले जात आहे.

भाजप सरकारवर सडेतोड टीका करणारे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट केले आहे की,’पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या तीन घोषणांचे आपल्या सर्वांनी स्वागत केले पाहिजे, यामध्ये छोटे कुटुंब हे देश हिताचेच कार्य आहे, वेल्थ क्रिएटर्सचा आदर करा तसेच सर्वांनी प्लास्टिक बंदीचे पालन करा.’ या ट्विटनंतर सध्या सोशल माध्यमांमध्ये युजर्स आश्चर्यचकित झाले आहे. तत्पूर्वी मोदी सरकारच्या अर्थसंकल्प दिशाहीन असल्याची टीका पी. चिदंबरम यांनी केली होती.

All of us must welcome three announcements made by the PM on I-Day

> Small family is a patriotic duty
> Respect wealth creators
> Shun single-use plastic

— P. Chidambaram (@PChidambaram_IN) August 16, 2019

Leave A Reply

Your email address will not be published.