बॉलिवूडमधील आघाडीची गायिका नेहा कक्कर काही महिन्यांपूर्वी तिच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत होती. आता ती पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. होय, इंडियल आयडॉल 10 च्या एका स्पर्धकासोबत तिचे नाव जोडले जात आहे. नेहाने इंडियन आयडॉल 10 हा रिऍलिटी शो जज केला होता. याच शोमधील एक स्पर्धक विभोर पाराशर आणि नेहाच्या डेटींगच्या बातम्या सध्या जोरात आहेत.
अलीकडे नेहाने विभोरसोबत अनेक इव्हेंट केलेत. यादरम्यानचे दोघांचे फोटो, या फोटोतील दोघांची केमिस्ट्री बघता, त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली. अर्थात या चर्चा ऐकून विभोर ने आपली नाराजी व्यक्त केली आहे. या विषयी बोलताना तो म्हणाला की, या सगळ्या चर्चा तुम्ही अफवा समजू शकतात. कुणी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मदत करत असेल तर ते केवळ तुमच्यातील टॅलेंटमुळे.
मी इन्स्टाग्रामवर नेहाला “दीदी’ म्हणून टॅग करत नाही, यावरून ती माझी गर्लफ्रेन्ड आहे, असा अर्थ लोकांनी लावला. आज मी जे काही आहे, केवळ तिच्यामुळे आहे. मी तिचा प्रचंड आदर करतो. अशा अफवांवर मी रिऍक्ट होऊ नये, असे मला वाटते. अशा बातम्या ऐकल्या की माझी सटकते, असे तो म्हणाला. अद्याप नेहाने या चर्चांवर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.