गल्लीपासून दिल्लीपर्यंत अन् परभणीपासून जर्मनीपर्यंत छोटीशी टपरी असो वा फाईव्ह स्टार हॉटेल असं सर्वचं आता गुगलवर उपलब्ध आहे. गुगल हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन असून लोक इथं निरनिराळ्या गोष्टी शोधत असतात.
गुगलचा वापर एवढा सर्रास झालाय की आता एखाद्या व्यक्तीची प्रसिद्धी तो गुगलवर किती वेळा शोधला जातोय याच्यावर ठरू लागलीये. हे सर्व इथं सांगण्याचं कारण असं की, अन्वेशी जैन ( Anveshi Jain ) नावाच्या एका अभिनेत्रीने गुगलवर सर्वाधिक शोधलं गेल्याचा मान पटकावला असून आज आपण ती नक्की कोण आहे? हे जाणून घेणार आहोत.
जर तुम्हाला माहिती नसेल तर अन्वेशी जैन हिने अल्ट बालाजीच्या गंदी बात – २ ( Gandii Baat ) या इरॉटिक ऑनलाईन सिरीजमधून आपल्या अभिनय कारकीर्दीस सुरुवात केली. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी अन्वेशीने Anveshi Jain इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे. ती मूळची मध्यप्रदेशातील खजुराहो शहरातील असून तिने अभिनेत्री बनण्यासाठी एमबीएचे शिक्षण अर्ध्यावर सोडत मुंबई गाठली होती.
मायानगरीमध्ये Anveshi Jain ने ३ वर्ष स्ट्रगल केल्यानंतर अखेर तिला गंदी बात – २ ( Gandii Baat ) या इरॉटिक ऑनलाईन सिरीज द्वारे पहिला ब्रेक मिळाला. हा पहिलाच ब्रेक तिच्यासाठी इतका लकी ठरला की ती आज गुगलवर सर्वाधिक शोधली गेलेली अभिनेत्री ठरली आहे.
मात्र अन्वेशीच ( Anveshi Jain ) यश हे केवळ गुगलपुरतेच मर्यादित राहिले नसून तिने स्वतःचं एक ऍप देखील लाँच केलंय. Anveshi Jain Official App असं या ऍपचं नाव असून ते १ लाख लोकांनी डाऊनलोड केलंय. या ऍपवर ती ( Anveshi Jain ) आपले फोटो व व्हिडीओ अपलोड करत असते.
याखेरीज ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मेंटल हेल्थ व डेटिंगबाबत देखील सल्ले देत असते. मात्र इरॉटिक सिरीजमधून नावारूपाला आलेल्या या अभिनेत्रीने आता यापुढे अशा धाटणीच्या सिरीज वा चित्रपटांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतलाय.