मुंबई – देशासह राज्यात दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही तेवढ्याच वेगाने मोठी वाढ होत आहे. काही ठिकाणी तर ऑक्सिजन, औषधं आणि रुग्णालयात बेडसाठी नागरिकांना रांगा लागल्या आहेत.
सध्या देश सर्वच बाजुंनी संकटात सापडला असता, या भयानक महामारीचा सामना करण्यासाठी आता देश एकवटला असून गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वचजण मदत करत आहेत. सामान्य नागरिकांपासून तर बॉलिवूड मधील अनके दिग्ज कलाकार मंडळी आपापल्या परीने मदत कार्य करत आहेत.
या कठिणप्रसंगात लहान मुलेही मागे राहिले नसून सध्या सोशल मीडियावर एका चिमुरड्याचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिसून येते कि, “या मुलाची आई रुग्णालयात दाखल रूग्णांसाठी जेवण बनवते! आणि हा लहानगा फूड पॅकेटवर लिहित आहे… “खूश रहिए… असे कॅप्शन देण्यात आलंय’.
इस बच्चे की माँ हॉस्पिटल में भर्ती मरीजों के लिए भोजन बनाती हैं, और यह नन्हा सा बच्चा भोजन के हर पैकेट पर लिखता है..”खुश रहिए” ❤️
बात बहुत छोटी सी है पर दिल को छू गई, ईश्वर से प्रार्थना है कि इस बालक की मुस्कान सदैव बनी रहे !!🙏@sushant_says @ajitanjum pic.twitter.com/eXBCu4Lwcg
— Dinesh Kaushik (@DineshKaushik_) May 18, 2021
आपल्या समोर असलेल्या टेबलवरील जेवणाच्या पॅकेटवर हा मुलगा खूश रहिए असं लिहत आहे. या चिमुकल्याचा छोटासा संदेश रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा आधार देणारा आहे. आणि या महामारीत आपण जिंकू असा आत्मविश्वास निर्मण करत आहे. सध्या हा फेसबुक, इंस्टाग्राम , ट्विटआणि व्हॉट्सअपवर चांगलाच व्हायरल झाला आहे.