कोणता खान जास्त आवडतो?

माधुरी दीक्षितने तिन्ही खानसोबत अर्थात आमिर, सलमान आणि शाहरुखसोबत चित्रपट केले आहे. तिघांबरोबर तिची जोडी प्रेक्षकांकडून पसंत करण्यात आली. बॉक्‍स ऑफिसवर देखील त्यांना यश मिळाले आहे. नेहमी हा प्रश्‍न विचारण्यात येतो की तिन्ही खान पैकी कोणता खान उत्तम आहे? जास्त करून नायिका ही गोष्ट चांगल्या प्रकारे टाळून देतात. माधुरीसमोर जेव्हा हा प्रश्‍न ठेवण्यात आला तेव्हा तिने याचे उत्तर दिले.

माधुरी म्हणते की, आमिर खानसोबत मी दोन चित्रपट केले आहे आणि तो “लव्हली को-स्टार’ आहे. सलमानपण आहे, पण सर्वात चांगले माझे शाहरुख सोबत जमते.’ माधुरीनुसार तिला शाहरुखचा “सेन्स ऑफ ह्यूमर’ फार आवडतो. तो जेंटलमॅन आहे आणि नेहमी आपल्या नायिकांचे लक्ष ठेवतो. शाहरुख खान म्हणून जास्त नायिकांचा फेव्हरेट आहे.

सध्या तिन्ही खान फ्लॉप चालले आहेत. शाहरुखला “फॅन’, “जब वुई मेट सेजल’ आणि “झिरो’चे लागोपाठ धक्के बसले आहेत. अशावेळी शाहरुख माधुरीबरोबर एक सिनेमा करण्याचा विचार करायला लागला आहे. मधुर भांडारकरच्या “इन्स्पेक्‍टर गालिब’ची स्क्रीप्ट शाहरुखला आवडली आहे. या सिनेमाविषयी पूर्वीपण चर्चा झाली होती. पण शाहरुखला आताच या सिनेमाची आठवण झाली. त्याच्या रोमॅंटिक इमेजला फाटा देत शाहरुखने हा ऍक्‍शन रोल स्वीकारला आहे. यामध्ये त्याच्याबरोबर माधुरी दीक्षित असण्याची शक्‍यता आहे. म्हणजेच माधुरीला आपल्या आवडत्या खानसोबत काम करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.