“केदारनाथ’ रिलीज झाल्यावर सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खानची जवळीक वाढली होती. त्यांच्यातल्या भेटीगाठी, डिनर डेट वाढल्या. साराच्या अगोदार “राबता’ मुळे सुशांत आणि कृती सेननमध्ये स्वीट केमिस्ट्री जमली होती. या दोघींच्याही आगोदर अंकिता लोखंडेबरोबर सुशांतचे डेटिंग सुरू होते. पण आता या सर्व गर्लफ्रेंडची नावे मागे पडली आहेत. सुशांतच्या जोडीला आता नवीन गर्लफ्रेंडचे नाव असल्याचे समजते आहे. त्याच्या या नव्या गर्लफ्रेंडचे नाव आहे रेहा चक्रवर्ती.
सुशांत आणि ऍक्ट्रेस रेहा चक्रवर्तीची ओळख अगदी अलीकडेच झाली आहे. पण या थोड्याच कालावधीमध्ये त्यांच्यातील ओळख आता “खास मैत्री’मध्ये बदलली आहे. सध्या रेहा चक्रवर्तीच्या घरी सुशांतच्या फेऱ्या खूपच वाढलेल्या दिसत आहेत. अधिकृतपणे सांगायचे तर त्यांच्यातले डेटिंग वाढले आहे. ते दोघेही आपल्यामध्ये केवळ चांगली मैत्री असल्याचे सांगत असले तरी सगळ्यांना काय ते समजतेच…!
सध्या सुशांत आपल्या लोणावळ्यातल्या घरीच असतो. रेहाही काही वेळेस तिकडेच असते. त्यांच्या या खास मैत्रीला अजून तरी कोणते रिलेशनशीपचे नाव दिले गेलेले नाही. पण ते तसे दिले जाण्याची सुशांतला आवश्यकताही वाटत नाही. गेल्या 10 वर्षात तीन वेळा रिलेशनशीप स्टेटस बदलणाऱ्या सुशांतला आता त्या लेबलची आवश्यकताही भासत नसावी. सुशांतचा पुढचा सिनेमा “छिछोरे’ याच वर्षी 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे. त्यामध्ये सुशांतच्या बरोबर श्रद्धा कपूर दिसणार आहे. याशिवाय बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर “चेहरे’मध्येही तो असणार आहे.