फडणवीस कुठे जुने झाले; ‘नया है वह’वरून राऊतांचा टोला

मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर  ‘नया है वह’ म्हणत टीका केली होती. या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिल आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीसही नवेच आहेत, ते जुने कुठे झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणांना संधी द्यावी, या मताचे आहेत. अमित शाहसुद्धा दिल्लीच्या राजकारणात नवीन असून गृहमंत्री म्हणून त्यांनी दिल्लीत उत्तम काम केले. आम्ही कौतुक करतोच. त्यांना आम्ही ‘नया है वह’ म्हटलं का?, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

संजय राऊत यांनी मध्यप्रदेश आणि राजस्थान मधील सत्तासंघर्षांवरून भाजपवर टीका केली. भगवान शंकराशी निगडीत कमळाच्या फुलाचे ‘ऑपरेशन कमळ’ करुन स्थिर सरकार पडण्याची फार चुकीची पद्धत सुरु असल्याचे राऊत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.