राजगुरूनगर : खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील ज्या गावांमध्ये 5 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्या गावांमध्ये 10 दिवसांचे लोकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने हि घोषणा केलीआहे
ज्या शहर व गावात पाच पेक्षा अधिक रुग्ण असतील त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून उद्यापासून पुढील 10 दिवस कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे. औद्योगिक क्षेत्र सुरू राहणार आहे व शेती संबंधित खते औषधांची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
जुन्नर, खेड, चाकण, आळंदी या प्रमुख नगर परिषद क्षेत्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असल्याने चारही शहरे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या शहरांमध्ये दुध वितरण व वैद्यकीय सेवा, बँक वगळता सर्व दुकाने, रस्ते बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकरी संजय तेली यांनी दिले.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1268643683475334/
प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये औद्योगिक वसाहत सुरू राहणार असून या औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या कामगारांसाठी स्वतंत्र पासची व्यवस्था करण्यात येणार आहे. कंपन्यांनी सोशल डिस्टंसिंग, मास्क वापरणे सॅनिटायझ करणे आदी सर्व गोष्टींचा वापर करून योग्य पद्धतीने काळजी औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या सुरू ठेवण्याची नियमावली करण्यात आली आहे.