‘संगरेजों की चुभन का मुझे एहसास कहाँ’ – नवाब मलिक 

मुंबई – शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तळ्यात-मळ्यात असणाऱ्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंब्याचे पत्र न दिल्याने राज्यपालांनी दिलेल्या 24 तासांच्या मुदतीत शिवसेना सरकार स्थापन करण्यास अपयशी ठरली आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रकृती बरी नसतानाही संजय राऊत यांनी रुग्णालयातून ट्विट करत शिवसेनेने हार मानली नसल्याचे संकेत दिले आहेत. राऊतांच्या ट्विटला रिट्विट करत नवाब मलिक यांनीही त्यांना साथ दिली आहे.

संजय राऊत म्हणाले कि, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती’ बच्चन. हम होंगे कामयाब.. जरूर होंगे…’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावर नवाब मलिक यांनी म्हटले कि, संगरेजों की चुभन का मुझे एहसास कहाँ, में तो मंज़िल के मीनारों पे नज़र रखता हूँ, असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.