वाघोली – पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत तेवीस गावांचा समावेश झाला आहे या 23 गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम पीएमआरडीए कडे आहे. पीएमआरडीए च्या विकास आराखड्यानुसार पुणे महानगरपालिका या गावांसाठी विकास कामे करणार असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे मात्र गावे समाविष्ट होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला आहे या पंधरा दिवसांमध्ये वाघोली मधील अनेक वर्षांपासून चे समस्या सोडवण्यासाठी नेते मंडळी पुढाकार घेत असल्याच्या घोषणा करत आहेत मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार कधी? आणि नागरिकांच्या समस्यांमधून सुटका कधी होणार? असा सवाल या निमित्ताने निर्माण होऊ लागला आहे.
वाघोली मध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामसेवक हे नागरिकांच्या त्या त्या भागातील समस्या लक्षात घेऊन विकास आराखड्यात समाविष्ट कामे व त्यासाठी योग्य त्या निधीची तरतूद करत होते यामुळे त्या त्या भागातील विकास होण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. वाघोली मधील ज्या कामासाठी जास्त निधी ची गरज आहे अशा कामांबाबत देखील वेळोवेळी पाठपुरावा करून ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी स्थानिक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्यामार्फत शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी आणला गेला आहे हीच परिस्थिती पुणे महानगरपालिकेत गाव समाविष्ट झाल्यानंतर वाघोली ची असेल आणि जास्तीत जास्त निधी वाघोली साठी मिळेल व नागरिकांची समस्या त्वरित दूर होईल अशी आशा नागरिकांमध्ये निर्माण झाल्याने वाघोली साठी चा विकास आराखडा वाघोली करांच्या आशा निर्माण करणारा की वाघोलीकर यांच्या निराशेत भर पाडणारा ठरतो आहे आगामी काळात पहावे लागेल.
“वाघोली मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या साथीने पुणे महानगरपालिका प्रशासन व वाघोलीतील नागरिक यांच्यात समन्वयाची भूमिका बजावण्यात येणार आहे. वाघोलीतील वीज पाणी व इतर समस्या यांच्या देखभाल व दुरुस्ती बाबत पुणे महानगरपालिकेकडून त्वरित कामे करण्यात येणार आहेत. आगामी काळात जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून या भागातील समस्या सोडवण्यास मदत केली जाणार आहे.”
— सुनील टिंगरे (आमदार, वडगाव शेरी विधानसभा मतदार संघ)
“पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या तेवीस गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम राज्य शासनाने पीएमआरडी कडे दिले आहे. बांधकाम परवानगीचे अधिकार देखील पी एम आर डी कडे आहेत. बांधकाम परवानगी देताना आकारले जाणारे बांधकाम शुल्क यामधून पीएमआरडी कडे मोठ्या प्रमाणात निधी संकलित होणार आहे. पी एम आर डी कडे जमा होणारा बांधकाम शुल्क निधी महानगरगरपालिकेकडे वर्ग करावा व त्यातून निधीतून
त्या त्या गावांमध्ये विकास कामे करण्यात यावीत. राज्य शासन, पुणे महानगरपालिका यांच्याकडून वाघोली साठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, आमदार सुनील टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करण्यात येणार आहे. वाघोलीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” — रामभाऊ दाभाडे (माजी जिल्हा परिषद सदस्य)