क्रेडिट कार्डचा वापर करताना… (भाग-२)

क्रेडिट कार्डचा वापर करताना… (भाग-१)

कार्ड घेण्याचा निर्णय घेताना व्याजचा दर, शुल्क आणि इतर संलग्न अधिभार ह्यावरच ठरवा. रोख परतावा आणि ऑफर ह्यांचा फायदा फक्त अधिक सोय इतकाच असावा, तो कार्ड घेण्याचे प्राथमिक कारण नसावा. फक्त रोख परतावा मिळतो आहे किंवा चांगली ऑफर आहे म्हणून कधीही कार्ड घेण्याचा निर्णय घेऊ नका. बॅलेन्स ट्रान्सफर: कधी कधी तुम्ही तुमच्या कार्डवर परतफेड न करता येणारा खर्च करता आणि मग उच्च व्याज दरामुळे तुमच्या खात्यावर परतफेड न केलेली रक्कम जमा होऊन बसते.

तुम्हाला लावण्यात येणाऱ्या व्याजच्या दराचे नीट निरीक्षण करा. काही बँका त्यांचा व्याजचा दर मासिक पद्धतीने प्रकाशित करतात. म्हणजे क्रेडिट कार्डवर 4% प्रती माह दर असला तर त्याचा अर्थ हा वार्षिक 48% असतो. हा खूपच अधिक दऱ आहे. तुम्हाला लावण्यात येणारा व्याजचा दर आणि त्याला संलग्न शुल्क आणि इतर भर योग्य आहे ह्याची खात्री शिल्लक रक्कम हस्तांतरित करताना करून घ्या.

ऑटो-डेबिट

क्रेडिट कार्डाच्या बिलाची रक्कम वजा करण्याच्या सूचना बँकेला केल्यास दर महिन्याला नियमितपणे क्रेडिट कार्डाचं बिल न चुकता भरलं जाईल. यात ठराविक रक्कम वजा करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त आपला कुठे खर्च होतो आणि तो कुठे कमी होऊ शकतो याचा अभ्यास करून खर्च करण्याची पद्धत बदलल्यास खर्च आणि कार्डाचा वापर मर्यादित ठेवण्यास मदत होईल. याबरोबरच दर महिन्याला क्रेडिट कार्ड स्टेटमेण्ट येतं. त्यात काही तांत्रिक चुका नाहीत ना,याची खात्री करून घ्या. नाहीतर इतरांच्या चुकांचा भुर्दंड भरावा लागेल.

– चतुर

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.