पुणे – एका बाजूला लोकमान्य टिळक यांच्या नावाने असलेला पुरस्कार स्विकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा उल्लेख केला. मात्र, त्याच वेळी शहरात मात्र, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी गेले असताना; मंदीराच्या समोरच असलेला भिडेवाडा मात्र पडदा लावून झाकण्यात आला होता.
याच भिडे वाडयात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली होती. मात्र, सध्या तो मोडकळीस आला असून या वाडयाचे राष्ट्रीय स्मारक करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी या ठिकाणी भेट दिल्यानंतर केली होती. मात्र, हे आश्वासनच राहिले असून पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात तर तो थेट पडद्याआडच ठेवण्यात आला. यावरून सोशल मिडीयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.