रेझर्स बर्न म्हणजे दाढी करताना त्वचा लाल होणे. बर्न झाल्यावर त्वचेवर डार्क लाल रंगाचे ठसे येण्यास आणि त्वचेची जळजळ होण्यास सुरुवात होते. रेझर बर्न लवकर बरेसुद्धा होत नाही. पण त्वचा पूर्ववत होण्यासाठी कमीत कमी दोन-तीन दिवसांचा कालावधी लागतो.
बऱ्याच वेळा खाजसुद्धा येण्यास सुरुवात होऊन बारीक पुटकुळ्या येतात. या समस्येपासून बचाव करण्यासाठी केस काढण्याची योग्य पद्धत वापरणे अत्यावश्यक आहे. त्याचसोबत बाजारात विविध कंपनीचे हेअर रिम्युव्हर उपलब्ध आहेत.
शेविंग करताना केस ज्या दिशेने आहेत त्या दिशेने करावे. तसेच रेझर एकाच ठिकाणी दोन-तीन वेळेस वापरू नये. दाढी करताना रेझरवरील ब्लेडच्या पाती धारदार असाव्यात. कारण धारधार नसल्यास केस काढताना त्यावर अधिक जोर लावून केस काढावे लागतात. यामुळे स्किन बर्नसह तुम्हाला जखम होण्याची शक्यता अधिक असते.
दाढी केल्यानंतर शेविंग क्रिम किंवा डीप मॉइश्चरायजिंग क्रिम जरूर लावावी. त्यामुळे त्वचा मऊ होईल आणि रेझर बर्नपासून बचाव होईल. रेझरने दाढी करताना एक उत्तम कंपनीची आणि पद्धतीची शेविंग क्रिम किंवा फोमचा वापर करावा, जेणेकरुन त्वचेसंबंधित अन्य समस्या उद्भवू नये याची काळजी जरुर घ्या.