नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने यूपीआय ऑटो पे (UPI Auto Pay) फीचरच्या प्रचारार्थ एक गाणे क्युरेट करण्यासाठी प्रसिद्ध बॉलीवूड रॅपर बादशाहसोबत करार केला आहे. बादशाहचे गाणे ‘लाइफ है वाव’ हे सामान्यांसाठी नाविन्यपूर्ण पेमेंट सोल्यूशन्स वितरीत करणाऱ्या कंपन्यांना सुविधा देण्याच्या ध्येयाने प्रेरित आहे. ही मोहीम कंपनीच्या ‘युपीआय चलेगा’ मिशनशी संबंधित आहे. या मिशनमध्ये विराट कोहली, रणवीर सिंग, जॅकलिन फर्नांडिस, दुलकर सलमान यांसारखे कलाकार दिसले.
० युपीआय ऑटो पे फिचर नेमके काय आहे?
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही काळापूर्वी युपीआय ऑटो पे फीचर लाँच केले होते. या फीचरच्या मदतीने, वापरकर्ते त्यांचे मासिक निश्चित खर्च स्वयंचलित मोडमध्ये करू शकतात. या अंतर्गत दरमहा 2,000 रुपयांपर्यंतचे पेमेंट करता येते. या वरील पेमेंटसाठी, वापरकर्त्याला त्याचा UPI पिन वापरावा लागेल. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने ईएमआयची कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यातून ठराविक रक्कम कापली जाते त्याच पद्धतीने ही प्रणाली काम करेल. UPI चे नवीन फीचर ऑटो पे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी, कर्ज, मेट्रो कार्ड पेमेंट करण्यासाठी, विमा भरण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार NPCI चे राजीव पिल्लई यांनी या डीलबद्दल सांगितले की, गायक बादशाहसोबतच्या या डीलमुळे आम्ही खूप खूश आहोत. आम्हाला विश्वास आहे की ऑटो पे फिचर गेम चेंजर सिद्ध होईल. ते म्हणतात की UPI चा वापर देशातील अनेक प्रकारच्या व्यवसायात पेमेंट म्हणून केला जात आहे. सध्या प्रमोशनसाठी बनवलेले गाणे यूट्यूब आणि सर्व लोकप्रिय म्युझिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे गाणे वायएएपी (YAAP) ने संगीतबद्ध केले आहे. रॅपर बादशाहचे खरे नाव आदित्य सिंह सिसोदिया आहे. पंजाबी गाण्यांनी त्यांनी करिअरची सुरुवात केली. त्याने योयो हनी सिंगसोबतही काम केले आहे.