मुंबई – मराठमोळा साज शृंगार या बाबत अलीकडे सर्वांनाच क्रेझ आहे. नऊवारी, सहावारी साडी, नथ, ठुशी, लक्ष्मी हार, मोत्याच्या कुड्या, कोल्हापुरी साज आणि असं बरंच काही फॅशनच्या दुनियेत एव्हरग्रीन हिट आहे.
View this post on Instagram
मेंदीच्या पानांवर…. मन अजून झुलते गं…… . #prajaktamali #distraction #instagram @🌿
अनेक मराठी अभिनेत्रींनीं आजवर हे लुक परिधान केले असून, आपली एक लक्षवेधी स्टाईल निर्माण केली आहे. अभिनेत्री ‘प्राजक्ता माळी’ सुद्धा दर दहा दिवसांनी साडी नेसलेला फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. यामध्ये तिचा अस्सल मराठमोळा लूक ते ट्रेंडी लुक सगळं काही पाहायला मिळतं.
नितळ त्वचा, नशिले डोळे, कमनीय बांधा अशी सौंदर्याची खाण असलेल्या अभिनेत्री ‘प्राजक्ता माळी’ने फॅन्सच्या हृदयात आपली एक खास जागा निर्माण केली आहे. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.
आपल्या अनोख्या स्टाईल मुळे प्राजक्ता प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. सोशल मीडियावरील तिच्या सर्वच फोटोंवर फॅन्स ब्युटिफूल, फॅब्युलस अशा कमेंट्स देतात. काही जण तर तिच्या प्रेमात सुद्धा पडले आहेत.
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताने आपल्या अभिनयाची मोहिनी दोन्हीकडे घातली. अभिनेत्री प्राजक्ता हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.