पुणे जिल्ह्यातील विकास कामांची सद्यस्थिती काय ?

पुणे – जिल्ह्यातील विकास कामांची सद्यस्थिती काय आहे, याबाबत जिल्हापरिषदेने ग्रामपंचायतीकडे माहिती मागविली आहे. ही माहिती ऑनलाइन पद्धतीने माहिती भरून द्यावी, असा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.

 

जिल्ह्यात करोनाचा शिरकाव झाल्यापासून विकास कामांची गती मंदावली. तर काही कामे पूर्णपणे थांबली. नवीन कामांना निधीची कमतरता असल्याने मंजुरी मिळालेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामांची स्थिती पाहून पुढील नियोजन केले जाणार आहे. दरम्यान, ऑनलाइन माहितीमध्ये काम मंजूर झालेले वर्ष, कामाचे नाव, प्रकार, सध्या किती टक्के काम पूर्ण झाले आहे आदी माहिती भरावी लागणार आहे.

 

गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या कामांना शंभर टक्के निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील कामांना वेग येणार आहे. तर ग्रामपंचायत स्तरावरील कामांना गती देण्यासाठी निधी उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

त्यामुळे निधी उपलब्ध झाल्यानंतर या कामांनाही गती येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने प्रलंबित कामांची माहिती ग्रामपंचायतींकडून मागवली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.