बारामती(प्रतिनिधी) :- शहरातील नामांकित व्यापारी प्रीतम शहा (लेंगरेकर) आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या पाच जणांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.
प्रितम शहा यांच्या आत्महत्या प्रकरणी शहर व तालुक्यातील नऊ जणांवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली होती. तिघे जण फरार होते. त्यापैकी एकाने पोलिसांसमोर शरणागती पत्करली.
नगरसेवक जयसिंह उर्फ बबलू देशमुख, बारामती बाजार समितीचे माजी सभापती संजय काटे, यांच्यासह प्रवीण गालिंदे , सनी आवाळे, विकास धनके, कुणाल काळे, संघर्ष गव्हाळे या सात संशयित पैकी पाच जणांचे जामीन मंजूर झाले आहेत.
जयसिंग उर्फ बबलू देशमुख, जयेश उर्फ कुणाल चंद्रकांत काळे, संजय कोंडीबा काटे, हनुमंत सर्जेराव गवळी,प्रवीण दत्तात्रय गालिंदे, सुनील उर्फ सनी आवाळे यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींकडे आता कोणताही तपास उरला नाही. या शिवाय पैशांची देवाण घेवाण हा व्यवहार होता याला सावकारी कसे म्हणता येईल इत्यादी मुद्यावर आज बारामती सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्या वतीने डी. डी. शिंदे, राजेंद्र काळे, सचिन वाघ, भार्गव पाटसकर यांनी बाजू न्यायालयात मांडली.