खळबळजनक! तिहार कारागृहात कैद्याचा खून

नवी दिल्ली – दिल्लीच्या तिहार कारागृहात एका 23 वर्षीय कच्चा कैद्याची कारागृहातल्याच अन्य तीन कैद्यांनी धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीला आला.

दिलेशरसिंग असे यात मरण पावलेल्या कैद्याचे नाव आहे. त्याच्यावर खुनाच्या आरोपासह अन्य तीन आरोप आहेत. पण त्या विषयीचे खटले अजून सुरू आहेत. त्याच्यावर अन्य तीन जणांनी हल्ला करून त्याला ठार मारले. पण त्याच्या हत्येचे नेमके कारण मात्र अजून समजलेले नाही.

त्याच्यावर हल्ला करणाऱ्या तीन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मरण पावलेला कौदी दिलेशरसिंग हा 11 जून 2019 पासून या कारागृहात आहे. त्याच्या विरोधात जहांगीरपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.