सहारा आणि येडियुरप्पाच्या डायरी नोंदीवर भाजप गप्प का? 

जेटलींचा कॉंग्रेसवर पलटवार

नवी दिल्ली  – ऑगस्ता वेस्टलॅंड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात अरूण जेटली बोगस डायरी नोंदीवरून खोटारडेपणाचे आरोप करीत आहेत पण त्यांच्या पक्षाचे नेते सहारा डायरी आणि येडियुरप्पांच्या डायरीवरील नोंदींबाबत मात्र तोंडदाबून गप्प का आहेत असा सवाल उपस्थित करीत कॉंग्रेसने आज भाजप नेते अरूण जेटली यांच्यावर पलटवार केला आहे.

ऑगस्ता वेस्टलॅंड प्रकरणात ईडीने जी कागदपत्रे सादर केली आहेत त्यात आरजी, एपी, एफएएम या शब्दांचे नेमके काय अर्थ आहेत असा सवाल उपस्थित करीत अरूण जेटली यांनी कॉंग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला होता. जेटली यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे की अरूण जेटली यांना या बोगस नोंदींविषयी अचानक स्वारस्य निर्माण झाले आहे. पण त्याच वेळी मोदी किंवा भाजपचे अन्य नेते सहारा डायरी आणि येडियुरप्पांची डायरी यातील नोंदींबद्दल गप्प का आहेत असा सवाल त्यांनी केला. सहारा डायरीत तर थेट मोदींनाच पैसे दिल्याच्या उल्लेख असून येडियुरप्पांच्या डायरीत भाजप नेत्यांना 1800 कोटी रूपये वाटण्यात आल्याचा तपशील आहे. त्या अनुषंगाने सुर्जेवाला यांनी हा सवाल उपस्थित केला.ढोंगीपणा करणे आणि दुटप्पीपणा करणे हाच भाजपचा डीएनए आहे असे त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.