जागतिक महामारी घेऊन आलेल्या करोना विषाणू सोबत आपण सर्वजण लढत आहोत. प्रशासनाने दिलेल्या नियम, अटींचे पालन केले तरच आपण सर्वजण या रोगापासून वाचू शकतो. इतरानांही वाचण्यास मदत करू शकतो. आज सर्वत्र लॉकडाउन आहे. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने चालू आहेत. मात्र, बऱ्याच ठिकाणी आपण फिजिकल डिस्टनस मेंटेन करत नाहीत.
त्यामुळे या रोगाचा पुन्हा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाउनमुळे सर्वसामान्य माणसापासून सर्वच स्तरातील लोकांची आर्थिक घडी बिघडली आहे. मोठ-मोठे उद्योगधंदे बंद आहेत. छोट छोटे उद्योग बंद पडण्याची भीती आहे. त्यामुळे भविष्यात गराजवंतांपर्यंत जेवण किंवा धान्य पोचविण्यासाठी सर्वांनाच पुढाकार घ्यावा लागेल. तसेच आपल्या परिसरात जर करोना रोगाची लक्षणे असणारी व्यक्ति आढळली, तर त्याची खबर प्रशासनास लगेच देणे योग्य होईल.
जेणे करुन पुढील धोका टळेल. आपण वेळीच शहाणे झालो नाही, तर हा करोना जसा जगात हाहाकार माजवतोय, तसाच तो आपल्या देशातही माजवेल. त्यासाठी सरकार व प्रशासनाला पूर्ण सहकार्य करा. आपल्या अर्थव्यवस्थेवरील बदल आता पहावे लागतील. बिघडलेली परस्थिती चांगली होण्यास खूप वेळ जाईल. या काळात सरकारकडून सर्वसामान्य व्यक्तीच्या खूप अपेक्षा आहेत.
सागर रमेश बोगाअध्यक्ष, नगर जल्लोष (ट्रस्ट) नगर. संपर्क – 9860612045
करोनाची महामारी बघता बघता जगभर पसरली. अगदी आपल्या दरवाजाबाहेर येऊन ठेपली. त्यावर अजुनही उपाय नाही.त्याच्या बचावासाठी आपण फक्त घरात बसून आहोत. पूर्वीचे ठराविक कामाचे स्वरुप आता बदलले आहे. अगदी सहज मिळणाऱ्या वस्तू मिळण्यात काही बंधने आलीत. रोजच्या आयुष्यात झालेला हा बदल स्वीकारणे अवघड जात आहे. तणाव निर्माण होत आहे. प्रत्येकाच्या मानसिक, भावनिक, आर्थिक घटकांवर दुष्परिणाम झाले आहेत. ते टाळता येणार नाहीत. काही सकारात्मक परिणामही झाले. करोना विषाणूकडे संकट म्हणून न बघता आता एक संधी म्हणून बघायला हवे. स्वतःकडे लक्ष द्यायला भरपूर वेळ मिळाला आहे.
त्यात आत्मपरीक्षण करावे. कामाच्या व्यापात कुटुंबासाठी वेळ देता येत नाही, छंद जोपासता आले नाहीत. आरोग्याकडे दुर्लक्ष झाले, अशा अनेक तक्रारी कमी करण्याची ही संधी आहे. शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग व प्राणायाम विद्या शिकून घ्यायला पुरेसी संधी आहे. यातून मिळणाऱ्या ऊर्जेचा उपचारासाठी विशेष फायदा होतो. “विनास्पर्श आणि विनाऔषध’ उपचारपद्धती असल्याने अनेकांना फिजिकल डिस्टंसिन्गच्या काळात देखील घरातून बाहेर न पडता उपचार घेता येत आहेत. करोनापासून बचावासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य आहार, व्यायाम, श्वसनाचे व्यायाम, पुरेशी झोप, आवश्यक आहे.
पुनम देशमुख – खाडे योग प्राण विद्या, एनर्जी हीलर, प्रशिक्षक, नगर. संपर्क : 80074 82608