छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका “अग्गबाई सासूबाई’मधील “बबड्या’ अर्थात सोहम कुलकर्णी आणि त्याची पत्नी शुभ्रा कुलकर्णी ही पात्र विशेष गाजली होती. ही पात्रे अभिनेता आशुतोष पत्की आणि अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारले होते.
दोघांनीही या भूमिकेत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. मात्र, आता पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली आहे.
नुकताच तेजश्री प्रधानचा वाढदिवस साजरा झाला. या निमित्ताने अभिनेत्रीला सोशल मीडियावर अनेक शुभेच्छा मिळाल्या. तेजश्रीसाठी अनेक पोस्ट लिहिल्या गेल्या.
मात्र, या सगळ्यात एका पोस्टने चाहत्यांचे खास लक्ष वेधून घेतले. ही खास पोस्ट केली तेजश्रीचा सहकलाकार अभिनेता आशुतोष पत्कीने केली आहे.
आशुतोषने तेजश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपल्या या पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझ्या प्रिय मैत्रिणी, मला तुला हे सांगायचं आहे की तू माझ्यासाठी खूप खास आहे.
तू दिलेल्या प्रोत्साहानाबद्दल, तुझ्या पाठिंब्याबद्दल आणि मला एक चांगला माणूस व अभिनेता बनण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल खूप आभार.
तुझ्या वाढदिवसानिमित्ताने खास 2 टिप्स : तू भूतकाळ विसरून जा, कारण तो बदलता येत नाही आणि दुसरं म्हणजे तुझ्या वाढदिवसाची भेट, जी मी आणलीच नाहीय वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!’
या पोस्टमध्ये आशुतोषने तेजश्रीला भूतकाळ विसरण्याचा सल्ला दिला आहे. तर, मजेशीर अंदाजात तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहे.