MNS Raj Thackeray| आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा होती. याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. परंतु यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे मनसे कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत.
अशातच राज ठाकरेंनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन गुडीपाडव्याच्या मेळाव्याचा ट्रेलर लॉन्च केला आहे. ‘९ तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय… हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे.,’ असं म्हणत राज ठाकरेंनी गुडीपाडव्याच्या सभेत नेमकं काय घडतंय? सर्व सांगणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे या गुडीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे मोठी भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. MNS Raj Thackeray|
९ तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय… हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे ! #मनसे_पाडवामेळावा #MNSGudhiPadwaRally pic.twitter.com/OgImzXTSQX
— Raj Thackeray (@RajThackeray) April 5, 2024
मनसेचा महायुतीला कसा होणार फायदा? MNS Raj Thackeray|
शिवसेनेच्या फूटीनंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. मुंबईवर विजय मिळवण्यासाठी आणि ठाकरेंना रोखण्यासाठी महायुतीला मनसेची मदत होऊ शकते. कारण मुंबईत शिवसेनेसोबतच मनसेचे वजनही मोठं आहे. शिवसेनेप्रमाणे मराठी व्होटबँक मनसेच्या बाजूनेही आहे. MNS Raj Thackeray|
मागील निवडणुकीतही मराठी व्होटबँक मनसेनं मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचले होते. त्यामुळे ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपने मनसेला महायुतीत सामील करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सध्या यावर कोणताही निर्णय झालेला नाही.
हेही वाचा: