मुंबई – अभिनेत्री दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘छपाक’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या दीपिकासह छपाकची संपूर्ण टीम सध्या चर्चेत आहे. याच दरम्यान पत्रकारांशी बोलतानाचा तिच्या विडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.
दरम्यान दीपिकाला चित्रपटाच्या प्रमोशनवेळी चित्रपटासोबतच त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयीही प्रश्न विचारण्यात आला. चित्रपटाचं प्रमोशन सुरु असताना एका व्यक्तीने दीपिकाला तिच्या प्रेग्नंसीविषयी काही प्रश्न विचारले.
हा प्रश्न विचारल्यानंतर दीपिका थोडीशी नाराज होत तिने स्पष्टपणे प्रतिप्रश्न केला. “मी प्रेग्नेंट दिसते का? जेव्हा मी फॅमिली प्लानिंग करेन तेव्हा तुम्हाला नक्कीच विचारेन.
जर तुम्ही परवानगी दिली तर मी प्लानिंग करेन. तसंच जर मी प्रेग्नंट असेन तर ९ महिन्यांनंतर सगळ्यांनाच समजेल”, असं सडेतोड उत्तर दिपिकाने दिलं.