ढाका : जगभरातल्या आश्चर्यकारक गोष्टींची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ठेवली जाते. या रेकॉर्डमध्ये जगातील वेगळ्या गोष्टी यामध्ये पाहायला मिळतात. सध्या बांग्लादेशातील अशाच एका वेगळ्या आणि आश्चर्यकारक असलेल्या गाईची नोंद गिनीज बुकने घेतली आहे.
बांग्लादेशात काही दिवसांपूर्वी राणी नावाच्या एका प्रसिद्ध गाईचे आकस्मित निधन झाले होते. या गाईची लांबी केवळ 20 इंच म्हणजे 50.8 सेमी इतकी होती. राणी नावाच्या या गाईला पहायला अनेक लोक यायचे. इतक्या लहान गाईला पाहून अनेकांना आश्चर्य वाटायचे.
राणीचे मालक असलेल्या काजी मोहम्मद अब सुफियान यांनी सांगितले, गेल्या सोमवारी त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून एक मेल आला होता. राणीचे नाव त्यामध्ये नोंद करण्यात आल्याची माहिती त्या मेलमधून देण्यात आली आहे. गिनीजच्या वेबसाईटवरही याची खात्री करण्यात आली आहे.
जगातल्या इतक्या लहान आकाराच्या या गायीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. या गाईचे काही दिवसांपूर्वी आकस्मित निधन झाले होते.
काही दिवसांपूर्वी राणी गाईच्या मालकाना ती जगातली सर्वात लहान गाय असल्याचा दावा केला होता. त्या आधी भारतात जगातली सर्वात लहान गाय असल्याचा दावा केला जात होता. भारतात केरळमध्ये सर्वात लहान गाय असून तिचे नाव माणिक्यम असे आहे. या गाईची लांबी केवळ 61 सेमी इतकी आहे.