#INDvsWI : कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर

पोर्ट ऑफ स्पेन – भारताविरुद्ध मायदेशी होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी यजमान वेस्ट इंडिजच्या 13 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी जेसन होल्डरवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, या संघातून स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला संघात स्थान दिले गेले नसून तो कारकिर्दीतील अखेरची कसोटी आता मायभूमीत खेळू शकणार नाही.

सबिना पार्क (किंग्स्टन) येथील घरच्या मैदानावर अखेरचा कसोटी सामना खेळायची संधी मिळावी, अशी इच्छा गेलने भारताविरुद्धच्या विश्‍वचषक सामन्यापूर्वी प्रकट केली होती. परंतु रॉबर्ट हेन्सच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज निवड समितीने गेलचा प्रस्ताव फेटाळला आहे. ख्रिस गेलला भारताविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत संधी मिळाली नव्हती. मात्र, त्याचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे.

कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या संघाचे कर्णधारपद जेसन होल्डरकडे देण्यात आले आहे. तर कायरन पॉवेल, देवेंद्र बिशू, सुनील ऍम्ब्रिस, शेरमन लुईस, जामेर हॅमिल्टन आणि जोमेल वारिकन यांनाही कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. हे सर्व जण गेल्या वर्षी भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज कसोटी संघात होते. आता संघात जॉन कॅम्बेल, डॅरेन ब्राव्हो, शमाराह ब्रुक्‍स आणि रहकीम कॉर्नवॉल यांचा समावेश आहे. तर शिमरोन हेटमायर, शाई होप, रोस्टन चेस, शेनन गॅब्रिएल, कार्लोस ब्रेथवेट आणि केमार रोच यांनी कसोटी संघातील आपले स्थान कायम राखले आहे. कसोटी संघात गेलला स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात येत होती.

वेस्ट इंडिज कसोटी संघ :

जेसन होल्डर (कर्णधार), जॉन केम्पबेल, डॅरेन ब्रावो, शमाराह ब्रुक्‍स, रहकीम कॉर्नवॉल, शेन डॉवरिच, शिमरोन हेटमायर, शाई होप, रोस्टन चेस, शैनन गैब्रियल, कार्लोस ब्रैथवेट, कीमो पॉल आणि केमार रोच.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.