येमेनमध्ये बंड; सौदी आघाडीचे हल्ले सुरू

एडन (येमेन): येमेनची राजधानी एडन इथे विभाजनवाद्यांनी बंड पुकारले असून राजवाड्याचा ताबा घेतला आहे. याच दरम्यान सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडी फौजांनी येमेनच्या दक्षिणेकडील भागावर जोरदार हल्ला चढवला आहे. येमेनमध्ये झालेली बंडखोरी संयुक्‍त अरब अमिरातीच्या चिथावनीमुळे झाली असल्याचे येमेनमधील सरकारने म्हटले आहे. या सरकारला सौदी अरेबिया पाठिंबा आहे. त्यामुळेच बंडखोरी मोडून काढण्यासाठी सौदीने त्वरित हल्ले सुरू केले आहेत. येमेन सरकारचे पाठीराखे आणि विरोधक अशांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री उडाली आहे. या दोन्ही गटंनी शिया हौती बंडखोरांना विरोध केला आहे.

आघाडीच्या फौजांनी केलेल्या हल्ल्यामुळे येमेनमधील सरकारला थेट धोका निर्माण करणाऱ्या विभाजनवादी “साउदर्न ट्रान्जिशनल कौन्सिल’ला त्यांच्या ताब्यातील एडनचा भाग सोडून द्यावा अन्यथा त्यांच्यावर अधिक जोरदार हल्ले केले जातील, असा इशारा दिला आहे. गुरुवारी सुरुवात हिंसाचाराला सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत 40 जण ठार झाले आहेत. तर अनेक नागरिकांसह 260 जण जखमी झाले आहेत, असे संयुक्‍त राष्ट्राने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रियाधमधील येमेनचे अध्यक्ष अबेद्राब्बो मन्सूर हादी यांना सौदी अरेबिया आणि संयुक्‍त अरब अमिराती आघाडीचा पाठिंबा आहे. ही आघडी इराणशी संबंधित हौती बंडखोरांशी लढत आहे. मात्र एका अन्य भागात हतुती आघाडी एडनच्या समर्थक फौजांशी लढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)