सॅम्युअल्सची अखेर क्रिकेटमधून निवृत्ती

जमैका – वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू मार्लन सॅम्युअल्सने अखेर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भ्रष्टाचार प्रकरणात त्याचा सहभाग उघड झाल्यानंतर त्याच्यावर दोन वर्षांची बंदी लावण्यात आली होती. ती संपुष्टात आल्यावर पुन्हा संघात स्थान मिळेल अशी त्याची अपेक्षा फोल ठरल्यामुळे अखेर त्याने निवृत्ती जाहीर केली.

कारकिर्दीत त्याने वेस्ट इंडिज संघाच्या टी-20 विश्‍वकरंडक विजेतेपदाच्या लढतींत सर्वाधिक घावा करण्याची कामगिरी केली होती. 2018 सालानंतर त्याचा वेस्ट इंडिज संघात पुन्हा समावेश झाला नाही. 39 वर्षांच्या सॅम्युअल्सने वेस्ट इंडिजकडून 71 कसोटी सामने तसेच 207 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

तसेच 67 टी-20 सामनेही खेळले आहेत. आक्रमक फलंदाज तसेच उपयुक्‍त गोलंदाज म्हणून त्याने संघाच्या अनेक विजयात मोलाटा वाटा उचलला होता. क्रिकेटच्या या तीनही प्रकारात त्याने 11 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत व 150 बळीही नोंदवले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.