ढाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मोदी तिथे पोहचले आहेत. यावेळी त्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यांसाठी केलेल्या प्रयत्नांच्या आठवणींना उजाळा दिला.
Feeling blessed after praying at the Jeshoreshwari Kali Temple. pic.twitter.com/8CzSSXt9PS
— Narendra Modi (@narendramodi) March 27, 2021
दरम्यान, आपल्या भेटीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी दक्षिण – पश्चिमच्या ईश्वरीपूर गावातील प्राचीन जेशोरेश्वरी काली मंदिरात दाखल झाले झाले. इथे त्यांनी काली मंदिरात पूजा-अर्चनाही केली. याची माहिती खुद्द पंतप्रधानांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना दिलीय. उल्लेखनीय म्हणजे, आजच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ च्या पहिल्या टप्प्यात मतदान पार पडतंय.
‘जेशोरेश्वरी काली मंदिरात पूजा करून धन्य पावलो’ असं आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी म्हटलंय. सोबतच आपला मंदिरातील पूजेचा एक व्हिडिओही पंतप्रधानांनी ट्विटमध्ये जोडलाय. सध्या या ट्विटची चर्चा सोशलवर जोर पकडत आहे.