भलं मोठ्ठं झाड आडवं टाकून “प्रवेश बंद’

कुरवंडीच्या ग्रामस्थांनी गावात येणाऱ्यांचा घेतला धसका

पेठ  -करोनाचा धसका जसा शहरी नागरिकांनी घेतला आहे, तसाच ग्रामीण भागातील नागरिकांनीही घेतला आहे. कुरवंडी (ता. आंबेगाव) येथील गावकऱ्यांनी शहरी भागातील नागरिक आपल्या गावात येऊ नयेत यासाठी गावात येणारा रस्ता भलं मोठ्ठं झाड आडवं टाकून “प्रवेश बंद’ असा मजकूर त्यावर लिहिला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांनीही आता करोनाचा चांगलाच धसका घेतल्याचे दिसत आहे. आंबेगाव तालुक्‍यातील सातगाव पठार भागातील कुरवंडी या गावाने गावाबाहेरील कोणताही नागरिक गावात येऊ नये, यासाठी गावात येणारा रस्ताच अडवला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांनीही करोनाबाबत स्वतःची काळजी स्वतः घेऊन इतरांनाही सुरक्षित ठेवावे, अशा भावना सामाजिक कार्यकर्ते रमेश तोत्रे आणि गावकरी व्यक्त करीत आहेत.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.