वेल डन भारती!

लॉकडाऊनच्या काळात चित्रपट, मालिका आदी सर्वांचे चित्रिकरण ठप्प झाले आहे. कोणत्याही स्वरूपाच्या चित्रिकरणाला परवानगी नाहीये. पण यामुळे आपली हौस आणि पॅशन खंडित न करता काही कलाकारांनी घरातूनच काही शो तयार केले आहेत. यातून या कलाकारांनाही उत्पन्न मिळत आहे आणि वाहिन्यांनाही तेच तेच कार्यक्रमांचे दळण दळण्यातून सुटका मिळत आहे. त्यांना नवा फ्रेश कंटेंट मिळत आहे. अशा कलाकारांमध्ये भारती आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया यांची सध्या चर्चा आहे.कलर्स वाहिनीसाठी ही जोडगोळी “हम तुम और क्‍वारंटाईन’ नावाचा एका कॉमेडी शो तयार करत आहेत. याचे प्रसारण सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता करण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

i love this song #love #blessed #timepass #quarantine #stayhome #fightagainstcorona @darshanravaldz @kaushal_j ❤️❤️❤️❤️

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen) on


हा कार्यक्रम प्रेक्षकांना मनमुराद आवडेल असा भारतीला विश्‍वास वाटतो. पण यासाठी किती मेहनत घेतली आहे आणि राहत्या घरातून हा शो करणे हे किती आव्हानात्मक आहे हे आमचं आम्हालाच माहीत ! कारण आमच्याकडे ना स्टुडिओमधल्यासारखा कॅमेरा आहे, ना तशा प्रकारची प्रकाशरचना! इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणारी वेगवेगळी माणसं सेटवर असतात, तसंही इथे काहीही नाही. इथे फक्‍त आम्ही दोघंच ! त्यामुळे हा शो करणे हे आतापर्यंत सर्वांतच एक्‍सायटिंगही होतं आणि चॅलेंजिंगही आहे, असं ती म्हणते.

 

View this post on Instagram

 

yaar mujhe bahut maza aata hai #tiktok banane maie #funnyvideo#love#timepass#selfshoot @tiktok ❤️😂❤️❤️❤️

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen) on

हा शो सांभाळून घर कसं चालवते असं विचारलं असता भारती पुढे म्हणते की, मी आणि हर्षने आपापली कामे विभागून घेतली आहेत. मी स्वयंपाक बनवण्याचे काम करते, घराची साफसफाई हर्ष करतो. शोबाबत बोलायचं तर स्क्रिप्ट, मेकअप, ड्रेसिंग ही जबाबदारी माझ्याकडे आहे; तर दिग्दर्शन आणि कॅमेरामन ही कामं हर्ष करतो !

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.