मंचर – येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी मंचर पोलीस ठाण्याला नुकतीच भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्याचे कामकाज आणि पोलीस वापरत असलेल्या विविध शस्त्रांची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. पोलीस रेझिंग डे सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांनी मंचर पोलीस ठाण्याला भेट दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहुल लाड, दत्तात्रय चासकर, पोलीस उपनिरिक्षक अर्जुन शिंदे, पोलीस कर्मचारी विनोद गायकवाड यावेळी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी मार्गदर्शन केले. पोलीस उपनिरिक्षक अर्जुन शिंदे यांनी एसएलआर, बारा बोअर पंप ऍक्शन गन, गॅस गन, 9 एमएल कार्बाइन मशीन गन, 9 एमएल पिस्टन, हॅंड ग्रॅनाईट, दारु गोळा आदी शस्रांची माहिती दिली.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहुल लाड यांनी गुन्हेगारी प्रवृत्ती, बलात्कार गुन्हे व कायदे, निर्भया पथक याविषयी माहिती दिली. पोलिस कर्मचारी नीलम शिंदे यांनी स्पर्धा परिक्षेविषयी माहिती दिली.विनोद गायकवाड यांनी आभार मानले.