शरद पवार गटातर्फे कार्याध्यक्षपदी निवड
मंचर – पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर टाकलेली जबाबदारीचे सार्थ ठरवून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची (शरद पवार गट) ताकद वाढण्यासाठी काम करू, असे प्रतिपादन भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी केले.
भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांची पुणे जिल्हा ग्रामीण भाग (शरद पवार गट) राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र पुणे येथील राष्ट्रवादीचे कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात पक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, आमदार अशोक बापू पवार, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रकाशराव मस्के, अंकुशराव काकडे, उद्योजक गुलाबराव धुमाळ, विशाल वाबळे, शरद बोंबे, गणेश पवार यांसह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ग्रामीण भागात पक्षाचे संघटनात्मक बांधणी तसेच पक्ष मजबूत करण्यासाठी काम करणार असून, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय धोरणे, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे निकम यांनी सांगितले.