नवी दिल्ली – देशाच्या राजधानीत २३ एप्रिलपासून देशातील कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेची मागणी जंतरमंतरवर होत आहे. त्यांच्या आदोलनाला विरोध होत असतांना विविध पक्षांचे नेतेही या आदोलनात सहभागी झाले.
आता शेतकरी आणि खाप पंचायतीचीही एन्ट्री झाली आहे. दरम्यान, 8 मे रोजी बॅरिकेड्स तोडण्यात आल्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्याने आंदोलनाच्या ठिकाणी गोन्धळ निर्माण झाला. प्रकरण तापत असल्याचे पाहून या आंदोलनातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक महिला कुस्तीपटू विनेश फोगटने माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
विनेश फोगट यांनी जंतरमंतरवर सांगितले की, आम्ही बजरंगबलीचे भक्त, आमच्या बाजूने ना बॅरिकेड्स तोडले गेले ना घोषणाबाजी करण्यात आली. या गर्दीत घुसलेल्या समाजकंटकांवर कारवाई करा. आमच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव आहे. या कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपचे अनेकवेळा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.