‘आम्हीही फ्रंटलाईन वर्कर’; देहविक्री करणाऱ्या महिलांचे लसीसाठी आंदोलन

ब्राझीलिया – आम्हीही फ्रंटलाईन कर्मचारी असून लसीकरणात आमचाही समावेश करावा अशी मागणी करत ब्राझीलमधील एका शहरात देहविक्री करणाऱ्या महिलांनी आंदोलन सुरू केले आहे.

ब्राझीलमधील दक्षिणपूर्व शहर बेलो होरिजोंटेमधील देहविक्री करणाऱ्या महिलांनी एक आठवड्यांचे धरणे आंदोलन सुरू केले असून त्या संपावर गेल्या आहेत. करोना लशीच्या लाभार्थ्यांच्या यादीत त्याचाही समावेश करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मिनास गॅरेस राज्यातील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या संघटनेच्या अध्यक्षा सीडा विएरा यांनी सांगितले की, आम्ही फ्रंटलाइन कर्मचारी आहोत आणि आम्हीदेखील अर्थव्यवस्थेचा एक भाग आहोत. आम्हालादेखील करोनाची घेण्याची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

महासाथीच्या आजारामुळे बंद करण्यात आलेल्या हॉटेलजवळही धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले की, आम्ही दररोज वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येतो. त्यामुळे आम्हाला लशीची आवश्‍यकता आहे. सध्या आरोग्य कर्मचारी, शिक्षक, वयस्कर आणि आजारी असलेल्यांना करोना लस देण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.