भोपाल – मध्यप्रदेशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळपासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन केला जाणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज ही माहिती दिली. कोविडशी संबंधित राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानांतर ते पत्रकारांशी बोलत होते.
करोना रुग्णांसाठी खाटांची संख्या एक लाखापर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्याशिवाय राज्यातील सर्वच शहरांमध्ये आठवड्याच्या अखेरीस 60 तासांचा लॉकडाऊन लागू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या तीन आठवड्यांत राज्य सरकारने रविवारी भोपाळ, इंदूर, जबलपूर आणि ग्वाल्हेरमध्ये लॉकडाऊन लादला आणि गेल्या काही रविवारी काही निर्बंध इतर शहरांवरही लागू केले आहेत.
कोविड -19 प्रकरणांमध्ये वाढ झालेल्या शहरांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विविध आपत्ती व्यवस्थापन गटांच्या बैठका होतील, करोना बाधित रुग्णांसाठीच्या खाटांची संख्या वाढवण्याबरोबर प्रत्येक जिल्ह्यात एक करोना केंद्र उभे करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे, असे चौहान म्हणाले.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा