पुणे – महापालिकेकडून जुन्या पर्वती जलकेंद्राच्या देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने येत्या गुरूवारी ( दि. ८ ) रोजी पर्वती एचएलआर (गोल व चौकोनी) टाकीवरून केला जाणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुसर्या दिवशी ( शुक्रवारी) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
पर्वती (गोल व चौकोनी) टाकी परिसर :- सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सव्र्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर.