तरुणांच्या पाठपुराव्याने थांबली पाण्याची गळती

पिंपरी – दिवसेंदिवस पाणी टंचाई तीव्र होत चालली आहे. शहरातील विविध ठिकाणच्या पाईपलाईन, कारंजे व नळजोडणीतील पाणी गळती होऊन लाखो लिटर पाणी रोज वाया जात आहे. याची दखल घेत थेरगाव सोशल फाउंडेशनने या सामाजिक संस्थेच्या तरुणांनी सातत्याने पाठपुरावा करत दुरुस्ती करवून घेतली आणि पाणी गळती रोखत हजारो लिटर पाणी वाचवले आहे.

शहरतील थेरगाव परिसरात महिनाभरापासून सुरू असलेली गळती थांबवण्यात आली नाही. कित्येक ठिकाणी जलवाहिन्यातून गळती होऊन रोज हजारो लिटर पाणी वाया जात होते. डांगे चौक, चिंचवड रोडला पंकज सिलेकशन, श्रीकृष्ण कॉलनी लेन नंबर-2, अरुण पार्क दत्तनगर, ओंकार कॉलनी गणेशनगर आदी ठिकाणी पाईप लाईन मधून दररोज हजारो लिटर पाणी लीकेज होऊन रस्त्यावर वाहून जात होते. थेरगाव सोशल फाऊंडेशनचे सदस्य राहुल सरवदे यांनी पाणीपुरवठा विभागाकडे सातत्याने गळती रोखण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. अखेर पाणी गळती होत असलेल्या वेगवेगळ्या ठिकणी दुरुस्ती करण्यात आली. या कार्यामध्ये पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व थेरगाव सोशल फाऊंडेशनचे सभासद अंकुश कुदळे, राहुल जाधव, कृष्णा सावंत, राहुल ढेबे, संतोष बीडवई, साहेबराव पुजारी, अशोक धुमाळ, महेश येळवंडे, युवराज पाटील हे सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)